मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (22:57 IST)

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची  सोय उपलब्ध असणार आहे. हे  मशीन घाटी रुग्णालयाला गेल्यावर्षीच मंजूर झाली होती. मात्र निधीअभावी येऊ शकली नव्हती. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर हे मशीन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. पुढच्या आठवड्यात मशीन कार्यान्वित होईल आणि  रिपोर्ट मिळायालाही सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
 कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या एका महिलेला रुग्णालयातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. गेले दहा दिवस या महिलेवर कोरोनासाठीचे उपचार सुरु होते. ज्यानंतर आता ती महिला पूर्णपणे बरी झाली असून, तिला सोमवारी दुपारी रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी या महिलेने देवाचे आणि डॉक्टरांचेही आभार मानले.