सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (16:16 IST)

‘मातोश्री’ बाहेरील सुरक्षा रक्षकाला कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्याला कलिना विद्यापिठात क्वॉरंटाईन करण्यात आले असून उर्वरित दोन जणांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. मातोश्री बाहेरील गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिस कर्मचाऱ्याचे कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांची देखील चाचणी करण्यात येणार आहे. सध्या पॉझिटिव्ह असलेले पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
यापूर्वी मातोश्री निवासस्थानापासून अगदी जवळ असणाऱ्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.