1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

कोरोना अपडेट : एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडले

Corona update
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. गुरुवारी  २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या  ३ लाख १ हजार  ७५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह ( २०.४४ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७ हजार ७४८  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी  ३९८  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.
 
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे. राज्यात ३९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर पूर्वीचे ७० मृत्यू असे ४६८ मृत्यू झाले आहेत. गुरुवारी नोंद झालेल्या ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत.