रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (11:27 IST)

कोरोना अपडेट : राज्यात २३,८१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात बुधवारी दिवसभरात २३,८१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९वर पोहोचला असून यांपैकी ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अद्याप राज्यात २,५२,७३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.  
 
राज्यातील रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ असून तर कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.८७ एवढे आहे. तर ४८,८३,००६ नमुन्यांपैकी आज ९,६७,३४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. बुधवारी संसर्गबाधितांचे प्रमाण हे १९.८१ टक्के आहे. राज्यात सध्या १६,११,२८० लोक होम क्वारंटाइन असून ३७,६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.