कोरोना अपडेट्स – नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास

Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सोमवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत १ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. रविवारी ही संख्या १७३१ होती मात्र सोमवारपर्यंत ही संख्या १९४५ झाली असून त्यात २१४ ने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५९, चांदवड १७, सिन्नर ६७, दिंडोरी ४४, निफाड ९९, देवळा १९, नांदगांव ५५, येवला २७, त्र्यंबकेश्वर २९, सुरगाणा ०९, पेठ ०२, कळवण १९, बागलाण ३१, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण ३६ असे एकूण ५३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार १७६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २१४ तर जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण १ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १९ हजार ९५८ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.१४ टक्के, नाशिक शहरात ९७.१९ टक्के, मालेगाव मध्ये ९२.०४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.५१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ इतके आहे.
नाशिक ग्रामीण ८२३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्हा बाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
– १ लाख १९ हजार ९५८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ९२५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ९४५ पॉझिटिव्ह रुग्ण.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले
देशातील कोरोना विराम घेण्याचे नाव घेत नाही. येथे, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

'तौकते' चक्रीवादळ पोरबंदरला खेटून पुढे सरकण्याची शक्यता, ...

'तौकते' चक्रीवादळ पोरबंदरला खेटून पुढे सरकण्याची शक्यता, गुजरात आणि कोकणमध्ये सतर्कतेचे आदेश
तौकते चक्रीवादळ पुढच्या 12 तासांमध्ये तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं ...

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं आयर्न डोम काय असतं?
हमास आणि इतर पॅलेस्टाईन कट्टरवादी संघटनांनी इस्रायलच्या दिशेने 1500 पेक्षा अधिक ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल
जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून ...