बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (10:46 IST)

बहुप्रतिक्षीत नाशिकची बससेवा (सिटीलिंक) येत्या महिन्याभरातच सुरू होणार

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत नाशिकची बससेवा (सिटीलिंक) येत्या महिन्याभरातच सुरू होणार आहे. तसेच, या बससेवेसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा मनपा आयुक्त तथा एनएमपीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्या  अध्यक्षतेखाली झाली. त्यात यास मान्यता देण्यात आली.या सभेत नाशिक शहर बससेवेच्या प्रकल्पाच्या विविध कामांची जसे आयटीएमएस, तिकीट वसुली बाबत संस्थेची नेमणूक, बस ऑपरेटर इत्यादी कामांचे सद्यस्थितीबाबत संचालकांना अवगत करुन देण्यात आले. तसेच खालील विषयांना मान्यता देण्यात आली.
 
शहर बससेवेसाठी बँकिंग पार्टनर, एस्क्रो अकाऊंट, पेमेंट गेटवेसाठी युनियन बँकेची नियुक्ती करणेस मान्यता देण्यात आली. शहर बससेवेसाठीच्या डिजीटल पेमेंट सोल्युशनसाठी पेटीएम यांना एक वर्षासाठी मान्यता देण्यात आली. शहर बससेवेसाठी स्थापन केलेल्या कपंनीचे मनुष्यबळ आकृतीबंध व त्यासंबंधीचे धोरणास मंजुरी देण्यात आली.
 
स्मार्ट सिटी सल्लागार मे. केपीएमजी यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवेसाठी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. सदर कंपनीने स्मार्ट सिटी अंतर्गत कामे केली आहेत. त्यामुळे सदर कामापोटी सल्लागार केपीएमजी कंपनीला नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. कंपनी कोणतीही फी देणार नाही असे सांचालक यांनी सुचविले त्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी शहर बससेवेसाठीच्या सिटीलिंक लोगो, वेबसाईट,मोबाईल ॲप्लीकेशन व रुट मॅप याबाबत चर्चा करणेत येऊन मान्यता देण्यात आली.