शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (10:02 IST)

बनावट कागदपत्राद्वारे बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा

श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.
 
याप्रकरणी माजी नगरसेवक व बँकेचे अध्यक्ष विलास एकनाथ नांदगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक देवेंद्र मोहन बारटक्के, रवींद्र सोनवणे, बँक अधिकारी गायत्री देशपांडे, बँक कशियर हेमलता नांदगुडे, स्मिता कदम, कर्जदार ज्ञानदेव बबन खेडकर, रामलिंग केदारी, तेजस जाधव, यशवंत जगन्नाथ पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी भगवान तुकाराम धोत्रे (वय 51 रा. मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सोमवारी (ता. 15) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
ही घटना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीमध्ये श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेडच्या विशाल नगर, पिंपळे निलख येथील शाखेत घडली. आरोपींनी आपसात संगणमत करून खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या पिंपळे निलख येथील शाखेत दिली. या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी कर्ज आणि ठेवीत गैरव्यवहार करून खोटे हिशोब नोंदवले. यातून बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे सभासद ठेवीदार निबंधक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.