शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:29 IST)

देशातील जनताच मोदी सरकारला घरी बसवेल : मोहन जोशी

केंद्रातील मोदी सरकार कृषी कायद्याबाबत आडमुठी भुमिका घेत आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु आडमुठे सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आंदोलना दरम्यान अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील जनता नक्कीच मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विश्रांतवाडी येथे शहर कॉग्रेस कमिटी वडगावशेरी मतदारसंघाच्यावतीने धरणे आदोंलन घेण्यात आले. त्यावेळी जोशी बोलत होते.
 
जोशी म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांना मिळणारे अन्नधान्य देखील बंद करण्याचा घाट मोदी सरकार घाट घालत आहे. यामुळे देशात सामान्य लोकामध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलन ही सामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे देशात कॉॅग्रेस शेतकार्‍यांना पाठिंबा देत आहे.जर सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकार्‍यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घेतले नाहीत, तर राज्यसह देशात आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.