सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:56 IST)

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १४ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करणार

दहा महिन्यांमध्ये एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १४ लाख ग्राहक असून, या सर्वाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. 
 
१ एप्रिल २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवडय़ांत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा. आवश्यकता असल्यास हप्त्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.