बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (15:53 IST)

पंजाबमध्ये आंदोलक शेतकऱ्यांकडून 1300 जिओ मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही गटांनी पंजाबमध्ये रिलायन्स जिओ मोबाईल टॉवरवर हल्ला केला आहे. 
 
राज्यात अनेक ठिकाणी यामुळे जिओ ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबमधील या गटांनी 1,300 मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
 
पंजाबमध्ये जिओचे 9 मोबाईल टॉवर्स असून यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स आंदोलकांनी कापल्या आहेत.
 
दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आंदोलक शेतकऱ्यांनी अदानी आणि अंबानीसारख्या बड्या उद्योजकांनाही विरोध केला आहे.
 
हिंसक कृत्य केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे.