Corona Vaccine : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी नवीन दर
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत.
सरकारी असलेल्या या दरात आता वाढ करण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ कोव्हिशिल्ड लसीच्या 10 डोस असलेल्या एक शीशीमागे सरकारला 50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
कोव्हॅक्सिन लसीच्या 20 डोस असलेल्या एका शीशी मागे सरकारला 180 रुपये जास्त मोजावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. आता नवीन किमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.