सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जुलै 2020 (17:43 IST)

Coronavirus Live Updates : मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक केले आहे. पण आता आपली आणखी कसोटी आहे. त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व माहिती....

05:42 PM, 21st Jul
फौजिया खान यांना कोरोनाची लागण  
राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

12:48 PM, 21st Jul
तेजस उद्धव ठाकरेंच्या दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेजस ठाकरेंसह इतर सुरक्षा रक्षकांची तातडीने करोना चाचणी करण्यात आली आहे.