गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

कोरोना विषाणू : राज्यात तिघे निरीक्षणासाठी दाखल

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असून उर्वरित दोघांचे प्रयोगशाळा अहवाल बुधवारपर्यंत मिळतील. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एक मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.