मुंबईत कोरोनाचा कहर, 24 तासात संक्रमणाची सुमारे 49,447 नवीन प्रकरणाची नोंद झाली !
मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणूची सुमारे49,447 नवीन प्रकरणे नोंदली गेली . राज्याच्या आरोग्य विभागात म्हटले आहे की गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 49447 रुग्ण आढळले आहेत. यासह, राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 4,01,172 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे 227 लोक मृत्युमुखी झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात कोरोनाहून 37,821 लोक बरे झाले आहेत. यासह, आतापर्यंत 24,95,315 लोकांनी कोरोनाला मात दिली आहे. तर मृतकांचा आकडा 55,656 वर पोहोचला आहे. शुक्रवारी कोविडचे 47827 नवीन प्रकरणे समोर आले होते.जे एका दिवसात जवळपास साडेसहा महिन्यांत सर्वाधिक नोंद झाले आहेत. शनिवारीही हा विक्रम मोडला. 3 एप्रिल संध्याकाळी 6 वाजे पर्यंत शहरात 9090 नवीन प्रकरणे सामोरी आले आहेत. मुंबईत कोरोनाला मात देत गेल्या 24 तासात 5 ,322 लोक बरे झाले आहेत.. सध्या मुंबईत कोरोना विषाणूची 62,187 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत शहरातील 3,66,365 लोक कोरोनाहून बरे झाले आहेत, आतापर्यंत एकूण 11,751 लोक मरण पावले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सांगितले की शुक्रवारी 20 रुग्णांचा मृत्यू झाला, डिसेंबर 2020 नंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. मुंबईत संसर्ग झालेल्यांची संख्या 4,32,192 पर्यंत वाढली आहे, तर आतापर्यंत 11,724 लोक मरण पावले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोना विषाणूची चिंताजनक परिस्थिती कायम राहिल्यास राज्यात लवकरच आरोग्य सुविधांची कमतरता भासू शकते. सोशल मीडियावर राज्यातील जनतेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, कोविड चे प्रकरण रोखण्यासाठी एक-दोन दिवसात कठोर बंदी घातली जाईल. ते म्हणाले, “जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर लॉक डाऊन ची शक्यता नाकारता येत नाही.
ते म्हणाले की ,''आम्ही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन उपलब्धतेसह बेडची संख्या वाढवू, परंतु आम्ही आरोग्य व्यावसायिकांशी काय करू?" आम्हाला अधिक आरोग्य कर्मचारी कोठे मिळतील? आता पर्यंत कोविडची 65 लाख डोस देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की काही लोक लसीकरणानंतर देखील संसर्गित होत आहेत कारण ते मास्कचा वापर करत नाही.कोविड संदर्भातील सर्व नियम लोकांनी पाळले पाहिजे. ते म्हणाले, "राज्य सरकारला गरिबांचे जीवनमान आणि अर्थव्यवस्था वाचवायची आहे, परंतु आम्हाला लोकांचे जीवनही वाचवायचे आहे."असं ही मुख्यमंत्री म्हणाले.