Dharma Sangrah
✕

५५२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ५२१८ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Updated: बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:39 IST)
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९  महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २६.८९ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रिये वर दावे आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली

२० हजारांच्या आत टॉप-५ ‘ऑलराउंडर’ स्मार्टफोन! सॅमसंग, रेडमी आणि मोटोरोला या यादीत समावेश

शुभमन गिल आणि शेफाली वर्मा यांना सप्टेंबर महिन्याचा 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार मिळाला

२४ डबे, १,२२४ प्रवासी आणि आधुनिक सुविधा; जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जोरदार स्वाक्षरी मोहीम

पुढील लेख
Show comments