1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2020 (10:02 IST)

राज्यात ३३ हजार १२४ रुग्ण अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण

coronavirus
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. 
 
गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या घडीला ३३ हजार १२४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
 
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात Recovery Rate हा ४३.३८ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. 
 
नोंद झालेल्या ११६ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ४८ रुग्ण होते. ५५ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील होते. तर १३ जण ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. करोनाची लागण होऊन राज्यात आत्तापर्यंत २०९८ मृत्यू झाले आहेत. नोंदवण्यात आलेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसातले आहेत.