मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (23:42 IST)

Covaxin: अमेरिकेतील कोवॅक्सिनच्या चाचणीत आढळले सकारात्मक परिणाम

COVAXIN
कोरोनाने पुन्हा एकदा पुन्हा तोंड काढायला सुरुवात केली आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या अँटी-कोविड-19 लस कोवॅक्सिनचे यूएसमध्ये सुरू असलेल्या फेज 2/3 चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. अमेरिका आणि कॅनडामधील भारत बायोटेकचे भागीदार असलेल्या ओकुजेन इंकने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे.
 
यूएस बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की कोवॅक्सिनवर आयोजित केलेल्या अभ्यासात 419 यूएस प्रौढ सहभागींचा समावेश होता. या सहभागींना 28 दिवसांच्या अंतराने कोवॅक्सिन किंवा प्लेसबोचे दोन डोस देण्यात आले. 
 
ओकुजेन इंक. चे अध्यक्ष आणि सीईओ शंकर मुसुनुरी यांनी म्हटले आहे की, या अभ्यासाचे सकारात्मक परिणाम कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा विजय आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की जेव्हा समाजातील काही लोक एमआरएनए आधारित लस घेण्यास संकोच करतात तेव्हा त्यांना या लसीच्या रूपात अतिरिक्त पर्याय मिळू शकतो. 
 
विशेष म्हणजे, भारत बायोटेकच्या भारतातील फेज III चाचणीमध्ये, कोवॅक्सिन लस घेणाऱ्या सहभागींच्या परिणामांची तुलना यूएसमध्ये कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांच्या परिणामांशी करण्यात आली. 
 
Edited By - Priya Dixit