शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (09:28 IST)

अहो आश्चर्यम, चक्क घोड्याला केले क्वारंटाईन

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात एक घोडा आणि त्या घोड्याच्या घोडेस्वाराला क्वारंटाईन करण्यात आले आहे. काश्मीर घाटीमधून एक व्यक्ती मुगल रोड मार्गाने राजौरीतील थन्नामंडी येथे पोहचला. या व्यक्तीबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर कोरोनाच्या संशयामुळे घोडा आणि त्याच्या मालकाला क्वारंटाईन करण्यात आलं. एखाद्या प्राण्याला क्वारंटाईन केल्याची ही पहिलीच घटना आहे. 
 
या घटनेत 125 किलोमीटर अंतर घोड्यावरुन पार करत हा व्यक्ती कोरोना रेड झोन भाग असलेल्या शोपियांमधून राजौरीच्या थन्नामंडी येथे पोहचला. घोड्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, अशी भीती काही जणांना वाटत आहे. पण घोड्याला जरी कोरोना झाला तरी हो इक्यूइन कोरोना व्हायरस असेल. हा कोरोना व्हायरस कोव्हिड १९पेक्षा वेगळा असतो. घोड्याला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाही, तसंच त्याला २८ दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात आलं. मालक कोरोना पॉझिटिव्ह असेल, तरच घोडा पॉझिटिव्ह होऊ शकतो. आम्ही औषधं देत आहोत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे इम्तियाज अंजुम यांनी दिली आहे.