मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 मे 2020 (15:48 IST)

15 जूनपर्यंत लॉकडाउन वाढण्याची शक्यता

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकार लॉकडाउनची मुदत 15 जूनपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
  
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन 4' हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण ही आकडेवारी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे देशातील लॉकडाउन 15 जूनपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील कोणतेही अधिकृत विधान केंद्राकडून आले नाही. आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि 4 लॉकडाउन पाहता लॉकडाउन 5 हा 15 जूनपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य  सरकार मिळून लॉकडाउन 4 चे परीक्षण करत आहेत. गृहमंत्रालय देखील राज्सरकारांसोबत ताळमेळ राखत यावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांकडून लॉकडाउन 4 संदर्भातील अहवाल मागितला जाणार आहे.