1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. Doubling the number of patients who have had corona free

दिलासादायक, कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या दुप्पट

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी देखील राज्यात दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. तर, १८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मंगळवारी ८ हजार ५२२ नवे करोनाबाधित आढळले असून, १५ हजार ३५६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८४.०३ टक्क्यांवर पोहचला आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ४३ हजार ८३७ वर पोहचली आहे. यामध्ये २ लाख ५ हजार ४१५ अॅक्टिव केसेस, करोनामुक्त झालेले १२ लाख ९७ हजार २५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४० हजार ७०१ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सदरची माहिती दिली आहे. 
 
सद्यस्थितीस २३ लाख ३७ हजार ८९९ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २५ हजार ८५७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या ७७ लाख ६२ हजार ०५ नमून्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमूने(१९.८९ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
पुढील लेख
एमपीएससीच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आणखी दोन परीक्षा रद्द