शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (17:25 IST)

पुण्यात वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार

पुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा एकदा वानवडी परिसरात वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार करण्यात आला.
 
मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) याच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना वानवडीतील इनामदार ग्राऊंडच्या शेजारील मोकळ्या जागेत सोमवारी (दि. 12) दुपारी बाराच्या सुमारास घडली. हांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर हांडे यांचा वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंडच्या शेजारी मोकळ्या मैदानात आले होते. यावेळी एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.