संबंधित माहिती
- पुण्यात वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार
- पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री
- SBIच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत ग्राहक YONO ऐप वापरण्यास सक्षम राहणार नाहीत, बँकेने माहिती दिली
- हा निर्णय़ अहंकारातून घेतला गेला, फडणवीस यांची बोचरी टीका
- धोनी ब्रिगेडचा आज विराट सेनेशी सामना
मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार
येत्या दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. मुख्यत्वेकरून मुंबई आणि ठाणे या भागात पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अहमदनगर, पुणे, सातारा यासारख्या भागातही गेल्या काही तासांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे हा परतीचा पाऊस असून यापुढच्या काळात मॉन्सून परतण्याची सुरूवात होईल असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. मुंबई तसेच ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
