सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (12:02 IST)

SBIच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत ग्राहक YONO ऐप वापरण्यास सक्षम राहणार नाहीत, बँकेने माहिती दिली

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि YONO App चा वापर करत असाल, ती ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 11 आणि 13 ऑक्टोबरला योनो एसबीआय रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे. अर्थात या दरम्यान app किंवा वेब पोर्टलवरून कोणतेही व्यवहार करता येणार (sbi online)नाही देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना एक जरूरी सूचना पाठवली आहे. एसबीआयने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की, एसबीआय मोबाइल अॅपवर मेंटेनन्सचे काम केले जात आहे. त्यामुळे 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत ते वापरता येणार नाही.
 
एसबीआयने ग्राहकांच्या गैरसोयीसाठी खेद व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या बँकिंग सेवा या सूचनेनुसार पूर्ण करण्याचे आवाहन देखील एसबीआयकडून करण्यात आले आहे. ही असुविधा टाळण्यासाठी ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगचा वापर करावा असे देखील एसबीआयने या नोटमध्ये (sbi online)म्हटले आहे.
 
YONO ला वेगळी कंपनी बनवण्याचा विचार- स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या योनोला वेगळी कंपनी बनवण्याचा विचार करत आहे. बँकेचे माजी चेअरमन रजनीश कुमार यांनी सेवानिवृत्त होण्याआधी याबाबत माहिती दिली होती. YONO अर्थात You Only Need one App हा एसबीआयचा एकीकृत बँकिंग प्लॅटफॉर्म आहे.
 
कुमार यांनी अशी माहिती दिली होती की, यासंदर्भातील बातचीत प्राथमिक पातळीवर सुरू आहे. याचे मुल्यांकन अद्याप बाकी आहे. रजनीश कुमार यांनी योनोचे मुल्यांकन 40 अब्ज डॉलरच्या आसपास असेल असे म्हटले आहे.
 
योनो एसबीआयने 3 वर्षांपूर्वी सुरू केले होते. यामध्ये आतापर्यंत 2.60 कोटी युजर्सनी नोंदणी केली आहे. दररोज 55 लाख लॉग इन या अॅपमध्ये होतात तर 4000 वैयक्तिक कर्ज तर 16 हजारांच्या आसपास योनो कृषी अॅग्री गोल्ड लोन देण्यात येतात. SBI Yono हा एसबीआयचा (भारतीय स्टेट बँक) एक इंटीग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याठिकाणी आर्थिक सेवांव्यतिरिक्त अन्य काही सेवा उदा. फ्लाइट, ट्रेन, बस आणि टॅक्सीचे ऑनलाइन बुकिंग करता येते.