रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (14:26 IST)

Coronavirus: भारतात करोनाचा पहिला बळी !

जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे हजारोंचा मृत्यू झाल्यानंतर आता भारतातही या विषाणूच्या संसर्गाचा पहिला बळी गेल्याची बातमी आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका ७६ वर्षीय करोना बाधित संशयीत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. मात्र, अद्याप या संशयीताच्या मृत्यूचा अंतिम अहवाल येणे बाकी असल्यामुळे व्यक्तीला करोना झाला होता किंवा नाही हे स्पष्ट होईल.
 
करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात सुमारे चार हजार मृत्यू झाले आहेत. भारतात देखील या व्हायरसची 50 हून अधिक लोकांना लागण झाली आहे. या सगळ्या रुग्णांवर विविध शहरांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.