मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (08:31 IST)

ग्लोबर टीचर रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण

ग्लोबर टीचर रणजीत डिसले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याबाबत त्यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले यांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
 
मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर डिसलेसरांना थकवा व इतर त्रास जाणवू लागला. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची कोरोना संबंधित चाचणी घेण्यात आली असता डिसले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आले. इतर कुटुंबीयांची चाचणी न कारात्मक आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहू करोना चाचणी करून घ्यावी. यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले आहे.