मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (17:06 IST)

सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे खासदार तसंच ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः तटकरेंनी ट्विटरवरुन आपल्या कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांच्या आशीर्वादानं लवकरच सेवेत रुजू होईन असं तटकरेंनी ट्विटवरुन सांगितलंय.  
 
ट्विट करत तटकरे म्हणाले, 'सोमवारी माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू  होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.