मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (10:59 IST)

फुटबॉलपटू रोनाल्डिनो कोरोना पॉझिटिव्ह

Footballer Ronaldinho Corona positive
ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिनो याला कोरोनाची लागण झाल्याचे त्याने सांगितले. 40 वर्षीय रोनाल्डिनोने कोरोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा रविवारी निकाल पॉझिटिव्ह आला. रोनाल्डिनोने स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. कोरोना लागण झाल्याचे समजल्यावर त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले असून कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. तसेच कोरोनामुक्त होईपर्यंत तो हॉटेल रूमच्या बाहेर पडणार नसल्याचेही त्याने सांगितले.