बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (23:55 IST)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 3260 नवीन रुग्ण, एकट्या मुंबईत 1648 नवीन रुग्ण आढळले

corona virus
बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 3,260 नवीन रुग्ण आढळले, तर आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला.या नवीन प्रकरणांमध्ये मुंबईतील 1,648 प्रकरणांचा समावेश आहे.यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या 79,45,022 झाली असून मृतांची संख्या 1,47,892 झाली आहे.एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या 3,659 प्रकरणांच्या तुलनेत बुधवारी राज्यात 399 कमी रुग्ण आढळले. 
 
राज्यात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन रुग्णांचा मुंबईत तर रायगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.राज्यात BA.5 उप-प्रकारची सहा नवीन प्रकरणे देखील आढळून आली आहेत.सध्या महाराष्ट्रात 24,639 उपचाराधीन रुग्ण आहेत, ज्यामध्ये मुंबईत राज्यातील सर्वाधिक 13,501 रुग्ण आहेत, तर ठाण्यात 5,621 रुग्ण आहेत.त्यात म्हटले आहे की, 3,533 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रात बरे झालेल्यांची संख्या 77,72,491 झाली आहे.राज्यात रिकव्हरीचा दर 97.83 टक्के आहे.मृत्यू दर 1.86 टक्के आहे