बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (08:07 IST)

पुण्यातही कोरोनाची गंभीर परिस्थिती तब्बल १ हजार ५०४ नवे करोनाबाधित सापडले

In Pune
एकीकडे राज्यातला करोनाबाधितांचा आकडा मोठ्या संख्येने वाढू लागलेला असताना दुसरीकडे पुण्यातही गंभीर परिस्थिती दिसू लागली आहे. पुण्यातही मुंबईच्याच संख्येमध्ये रुग्ण सापडल्याचं प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पुण्यात तब्बल १ हजार ५०४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. मुंबईमध्ये हाच आकडा १ हजार ५०९ आहे. पुण्यातली एकूण रुग्णसंख्या आता २ लाख १३ हजार २५ इतकी झाली आहे.
 
दुसरीकडे पुण्यात दिवसभरात कोविडमुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत २४ तासांत ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्यातल्या एकूण मृतांचा आकडा आता ४ हजार ९१७ इतका झाला आहे. मात्र, असं असताना एकूण बरे झालेल्या पुणेकरांचा आकडा १ लाख ९९ हजार ५६७ इतका झाला आहे.