1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 10 मे 2020 (16:55 IST)

अमेरिका, इटलीपेक्षा भारताची स्थिती चांगली

कोरोनाचा फैलाव संपूर्ण जगभर पसरला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स यंसारख्या विकसित देशांचेही आर्थिकरित्या कंबरडे मोडले आहे. लाखो जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, भारतात कोविड 19 ची परिस्थिती इतकी वाईट नाही, देश या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 
 
अनेक विकसित देशांत जी परिस्थिती दिसते, त्यापेक्षा चांगली स्थिती भारतात आहे, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांच्या संक्रमणाचा दर दुप्पट होण्यासाठी सध्या 11 दिवसांचा कालावधी लागत आहे. गेल्या सात दिवसांवर नजर टाकली तर हाच दर 9.9 दिवसांचा होता. देशात कोरोना संक्रणामुळे मृत्युमुखी पडणार्यांकचा दर 3.3 टक्के आहे, हा जगातील सर्वात कमी मृत्यू दर आहे. याशिवाय भारतातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) 29.9 टक्के आहे, हे सगळे चांगले संकेत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
 
देशात नव्याकोरोना प्रोटोकॉलनुसार, सौम्य कोरोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी टेस्टिंगची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत आणि परिस्थिती सामान्य असेल तर त्याला 10 दिवसांत रुग्णालयातून सुटी दिली जाईल. रुग्णालयातून परतल्यानंतर या रुग्णांना 14 दिवसांऐवजी 7 दिवसांपर्यंत होमआसोलेशनमध्ये राहावे लागेल. 14 व्या दिवशी टेली कॉन्फरन्सद्वारे या रुग्णांचा फेरआढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.