बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 एप्रिल 2020 (15:49 IST)

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत

कोरोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपायोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्‍येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीए केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिनेदेखील कोरोनाग्रस्तांना मदत केली आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर सार्‍यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृतीकेली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे.

पंतप्रधानांच आवाहनाला टीम इंडिाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर रोहित शर्मा यांनी  सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिने करोनाग्रस्तांसाठी 21 लाखांची मदत केली आहे.