संबंधित माहिती
- राज्यात मंगळवारी 2,069 नवीन रुग्णांची नोंद तर 3,616 रुग्ण कोरोनामुक्त
- मुलांसाठी Covaxin लशीला मान्यता, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस
- राज्यात दोन हजाराहून कमी रूग्ण, 3,033 जणांना डिस्चार्ज
- राज्यात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- राज्यात 2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
राज्यात बुधवारी कोरोनाचे 2,219 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे 2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
