रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (08:56 IST)

'या' शहरात कोविड केअर सेंटर किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल महिला रुग्णांची वेगळी व्यव्यस्था करण्याचे आदेश

कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासांठी कोव्हिड केअर सेंटर किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून घेताना पुरुष आणि महिला रुग्ण यांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. पुरुष आणि महिला रुग्णांना एकत्र ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील काही रुग्णालये आणि कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुरुष आणि महिला रुग्णांना एकत्र ठेवल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी हे आदेश दिले.
 
जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘करोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करताना पुरुष आणि महिला रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुरुष आणि महिला रुग्ण हे एकत्र ठेवल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.’
 
‘शहरासह जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ही संख्या रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्यात आला आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना गृह विलगीकरण करण्यात येत आहे. अन्य रुग्णांना कोव्हिड केअर सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. रुग्णांना दाखल करून घेताना रुग्णालयांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.