बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (07:35 IST)

गौरी खान अशी करत आहे गरीबांना मदत

बॉलिवूडचा किंग खान आणि त्यांची पत्नी गौरी खान एकत्र येऊन या संकटात मदत करत आहे. आता पत्नी गौरी खानने देखील मुंबईतील गरिबांना मदत करत असल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
 
कोरोना व्हायरसमुळे मुंबईत लॉकडाऊन दरम्यान कठीण परिस्थिती तोंड देणाऱ्या गरीब लोकांना मदत केली आहे. आतापर्यंत ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. याबाबतची सर्व प्रकारची माहिती गौरी खानने तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. 
 
आपल्या मीर फाउंडेशनची पोस्ट शेअर करताना गौरी खानने सांगितले आहे की, ‘रोटी फाउंडेशन आणि मीर फाउंडेशनच्या सहकार्याने मुंबईतील गरीब लोकांना ९५ हजार जेवाणाचे पाकिटे दिली आहेत. ही फक्त सुरुवात आहे. अजून अशाप्रकारची बरीच काम बाकी आहेत.’ तसंच गौरी खानने या कठीण परिस्थितीत मीर फाउंडेशनतर्फे होत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल माहिती दिली आहे.