मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (09:38 IST)

आजपासून नाशिक शहरात पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेरा द्वारेपण पेट्रोलिंग

*मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर करणार कारवाई*
जे नागरिक कोरोना हया आजाराच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य न बाळगता विनाकरण संचारबंदीआदेशाचे उल्लंघन करित होते अश्या 295 इसमांवर दी. 22/03/2020 ते दि. 26/03/2020 या दरम्यान भादवीक 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सकाळी मॉर्निंग वॉक ला निघून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल. उद्या दिनांक 27/03/2020 पासुन नाशिक शहरात ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे .अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणार्या नागरिकांनी सामाजिक अंतर( social distance) न पाळल्यास  भादविक, 188 नुसार  कारवाई करण्यात येईल .ड्रोन पेट्रोलींग मधे मिळालेल्या पूराव्याच्या आधारे ईतर कायद्याच्या कलमांन्वये देखील गुन्हे दाखल करण्यात येतील..त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये .अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास social distance पाळावे असे आवाहन मा.पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील सर यांनी  केले आहे.
 
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत "कोरोना पोलीस मदत कक्ष" तयार करण्यात आला आहे.त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढील माहिती देत आहोत.