शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 14 मार्च 2020 (12:30 IST)

राज्यात आजपासून तापमान वाढणार?

मुंबईसह राज्यात थंड आणि उष्ण असा तापमानाचा चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र शनिवारपासून हळहळू तापमानवाढीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून कमी नोंदवण्यात आले. त्यामुळे तापमानबदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
शुक्रवारी सकाळी मुंबईत अधिक गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होतं. त्यामुळे सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.४ अंश तर कुलाबामध्ये १९ अंश नोंदवण्यात आलं. तसंच किमान तापमानातील ही घसरण शनिवारीही अनुभवायला मिळू शकते, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.