बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (13:05 IST)

राज्याचा विकासदर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं आर्थिक पाहणीतील अनुमान

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज मांडला. राज्याचा विकास दर ५ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, तर राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत २ लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा या अहवालातून व्यक्त केली आहे.
 
उद्योग क्षेत्र वाढीचा दर ३ पूर्णांक ३ दशांश, तर सेवा क्षेत्र वाढीचा ७ पूर्णांक ६ दशांश टक्के राहील असंही या अहवालात म्हटलं आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील.