मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (12:13 IST)

'टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९'ची पी.व्ही.सिंधू ठरली मानकरी

PV Sindhu
नवी दिल्ली इथे टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार जागतिक बॅटमिंटनपटु पी.व्ही.सिंधू हिला जाहीर झाला. रिओ ऑलंपिक मध्ये रौप्य पदक आणि स्वित्झर्लंडच्या बासेल इथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सिंधूला गेल्या वर्षी ‘अनब्रेकेबल स्पिरीट ऑफ गोल’ हा पुरस्कारही मिळाला होता.
 
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे हॉकीपटू आणि ३ वेळा ऑलंपिक सुवर्णपदक विजेता बलबिर सिंग वरिष्ठ याला ‘आयकॉन ऑफ द सेंचुरी’ या पुरस्काराने सन्मानित केले.
 
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना 'मेंटॉर ऑफ द इयर' आणि नेमबाजी प्रशिक्षक जशपाल राणा यांना 'कोच ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले.