शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अकरावी प्रवेशाची अंतिम तारीखही वाढवली

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे जातीचं प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय, शिवाय त्याजागी प्रवेश घेताना पालकांचं हमीपत्र स्वीकारलं जाईल. अकरावी प्रवेशाची अंतिम तारीखही वाढवण्यात आली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
 
अकरावीत SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी 12 टक्क्यांप्रमाणे 34251 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रवर्गात केवळ 4 हजार 357 अर्ज आले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात अर्ज केल्याचं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गात अर्ज केलेल्या मराठा समाजातील (SEBC) विद्यार्थ्यांना आता प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.