मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (20:51 IST)

कोव्हीशिल्डचे 10 हजार डोस गहाळ झाल्यामुळे उडाली धांदल

कोरोनाव्हायरस संदर्भात देशात सर्वत्र लसीकरण केले जात आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लस सध्या दिली जात आहे.दरम्यान, मध्य प्रदेशातील जबलपूर येथून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
 
कोविडशील्ड लस 10 हजार डोस (एक हजार वायल) गहाळ झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केअर रुग्णालयाच्या नावाने ते खरेदी केले गेले ते तेथे नाही. आता प्रश्न आहे की कोव्हीशील्डची लस कोणी विकत घेतली आणि ती कोठे आहे?