गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (08:22 IST)

राज्यात १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता परंतू सोमवारपासून राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यानंतर मंगळवारी राज्यातील बाधितांचा आकडा वाढल्याचे दिसत आले. दरम्यान, राज्यात  मंगळवारी १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या मृत्यूंच्या संख्येच्या तुलनेत बळींच्या संख्येत वाढ होऊन २९५ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे.
 
यासह  मंगळवारी १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात मंगळवारी नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २०८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०७ ने वाढली आहे. हे ४०७ मृत्यू, ठाणे-६३, पुणे-५४, नाशिक-५२, अकोला-३०, सांगली-२९, सातारा-२२, यवतमाळ-२२, अहमदनगर-१९, नागपूर-१६, रायगड-१५, औरंगाबाद-१२, चंद्रपूर-११, कोल्हापूर-९, रत्नागिरी -८, नांदेड -६, उस्मानाबाद-६, सिंधुदुर्ग-६, सोलापूर-६, भंडारा-४, लातूर-४, जालना-३, अमरावती-२, बीड-२, जळगाव-२, परभणी-२, गडचिरोली-१ आणि गोंदिया-१ असे आहेत, ही माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे.