शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (08:20 IST)

राज्यात १२ हजार ५५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात आली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झालं नाही आहे. परंतु दिलासादायक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. राज्यात रविवारी १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकुण २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.
 
राज्यात आतापर्यंत १४ हजार ४३३ कोरोनाबाधितांनी मात केली आहे. तर आतापर्यंत एकून ५५ लाख ४३ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. एकुण १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी २३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ करोड ६५ लाख ८ हजार ९६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५८ लाख ३१ हजार ७८१ कोरोना चाचण्यांचे नमुने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नोंद झालेल्या एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८५ ने वाढली आहे. हे ३८५ मृत्यू, पुणे-१३७, नागपूर-४५, औरंगाबाद-३३, यवतमाळ-३१, अहमदनगर-२६, कोल्हापूर-२६, नाशिक-१८, सातारा-१२, लातूर-७, सांगली-७, गडचिरोली-६, बीड-५, गोंदिया-५, ठाणे-५, हिंगोली-४, सोलापूर-४, रत्नागिरी -३, सिंधुदुर्ग-३, अकोला-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, नांदेड-१, नंदूरबार-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत.