शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:38 IST)

राज्यात बरे झालेल्यांची संख्या अधिक,5,916 जणांना डिस्चार्ज

More cured in the state
राज्यात रविवारी  4 हजार 057 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 5 हजार 916 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.राज्यात सध्या  50 हजार 095 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 62 लाख 94 हजार 767 जण कोरोनामुक्त झाले आहेत.महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.राज्यात 67 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 774 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 2 लाख 99 हजार 905 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 007 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.