बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (09:33 IST)

सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आणखी एक कामगिरी केली आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या आहेत.भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहितने ही कामगिरी केली. रोहितने तीनही फॉरमॅटमध्ये या धावा पूर्ण केल्या आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावांचा टप्पा गाठणारा रोहित भारताचा आठवा क्रिकेटपटू बनला आहे.