मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (08:24 IST)

राज्यात एक लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात रविवारी ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.