गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 जुलै 2020 (09:08 IST)

राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्के

The recovery rate
राज्यात ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.