रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (08:34 IST)

राज्यात पहिल्यांदाच 'इतका' कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे. एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,५२,७६५ एवढी झाली आहे. तर सध्या ६५,८२९ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. २,३६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९,८१५ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे व्हायचे प्रमाण ५२.२५ टक्के एवढे झाले आहे. 
 
मुंबईमध्ये  दिवसभरात कोरोनाचे १,२९७ रुग्ण सापडले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७२,१७५ एवढा झाला आहे. तर मुंबईमध्ये ४४ मृत्यूंची नोंद झाल्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या ४,१७९ एवढी झाली आहे.