शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (08:31 IST)

जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाढण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये, ही आमची प्राथमिकता असल्याचंही टोपे म्हणाले आहेत. 
 
मुंबईतली रुग्णसंख्या कमी होईल, पण मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे तिथे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे