मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (17:46 IST)

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळू शकतो. चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळून आले. हे सगळे जण परदेशांमधून चीनला परतल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व संबंधित यंत्रणा अलर्टवर असल्याची माहिती चीनमधील अधिकाऱ्यानं दिली. परदेशात गेलेले चिनी नागरिक मायदेशी परतत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं आज दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे एकूण ३९ रुग्ण आढळले असून यातील ३८ जण परदेशातून आलेले आहेत. तर एक व्यक्ती स्थानिक आहे.