मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (09:58 IST)

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा आता ९७वर

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ९७वर पोहोचला आहे. राज्यात नव्याने ८ रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे, आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 
 
दिवसभरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना राज्यात नव्या १५ करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता यात पुन्हा आठ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत ११, पुणे, ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे. सांगतील आढळलेले रुग्ण हे सौदी-अरेबियातून आल्याचे कळते.